डिजिटल मार्केटिंग वी-लॉग # 002 प्राथमिक ओळख Digital Marketing V-Log # 002 – Introduction नमस्कार मी मंगेश करंदीकर या व्हिडिओ मध्ये आपण डिजिटल मार्केटिंगची प्राथमिक ओळख करून घेणार आहोत डिजिटल मार्केटिंग मध्ये आपल्याला काय काय करायचं असतं याचे काही पॉइंट्स मी आज सांगणार आहे.. तर सुरुवात करुया सर्वात मोठा प्रश्न असा की आपण डिजिटल मार्केटिंग कोणासाठी करतो? आपल्यासाठी की ग्राहकांसाठी? अर्थात आपण जेव्हा व्यवसायांमध्ये असतो तेव्हा नफा झाला पाहिजे, मात्र डिजिटल मार्केटिंग करताना हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण मार्केटिंग करतोय, मेसेज करत नाहीये. त्यामुळे आपण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय करतो ते ग्राहकांसाठी करतो त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होतो. मग आपला ग्राहक कोण हे पहिले आपल्याला ओळखलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल माझी उत्पादनं सर्वानाच लागतात. उदाहरणार्थ मी जर फराळाच्या वस्तू बनवत आणि विकत असेन, तर लहान मुलांपासून ते अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यानाच माझे पदार्थ उपयोगी आहेत. अगदी बरोबर! मात्र मार्केटिंग करताना सगळ्यांसाठी जर का मार्केटिंग केलं तर आपलं कम्युनिकेशन कदाचित सगळ्यांपर्यंत पोहोचणार नाह ी. डिजिटल मार्केटिंग करताना आपल्याला आपल्या ग्राहकांचे वेगवेगळे गट करायचे असतात आणि त्या गटांसाठी ठराविक मार्केटिंग करायचं असतं व प्रत्येक गटासाठी वेगवेगळं कम्युनिकेशन करायचं. जर आपण सर्व ग्राहकांच्या गटांसाठी एकच जाहिरात केली तर ती डिफ्युज होते विरून जाते. मग त्यासाठी आपण काय करायचं असतं? तर आपल्या ग्राहकांचे वेगवेगळे गट करून प्रत्येक गटाची वेगळी ओळख निर्माण करायची असते. म्हणजेच आपल्याला आपले वेगवेगळे टारगेट ऑडियन्स ठरवायचे असतात. त्या प्रत्येक टार्गेट ऑडियन्स ला आपण वेगवेगळे कम्युनिकेशन पाठवायचं असतं. या ग्राहकांच्या प्रत्येक गटाला एक व्यक्तित्व असतं या व्यक्तित्वाला इंग्रजीमध्ये कस्टमर पर्सोना असे म्हणतात. प्रत्येक गटाच्या व्यक्तित्वा नुसार आपण आपल्या डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी ठरवायची असते. या प्रत्येक गटाचे व्यक्तित्व किंवा पर्सोना लिहून काढायचा असतो म्हणजे आपण आपल्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी मध्ये कोणतीही चूक करत नाही आणि आपल्याला आपली स्ट्रॅटेजी ठरवायला ही खूप सोपं जातं..
Table of Contents
Images related to the topic 002 digital marketing

डिजिटल मार्केटिंग वी-लॉग #००२ प्राथमिक ओळख । Digital Marketing V-Log #002 – Introduction
Search related to the topic डिजिटल मार्केटिंग वी-लॉग #००२ प्राथमिक ओळख । Digital Marketing V-Log #002 – Introduction
#डजटल #मरकटग #वलग #००२ #परथमक #ओळख #Digital #Marketing #VLog #Introduction
डिजिटल मार्केटिंग वी-लॉग #००२ प्राथमिक ओळख । Digital Marketing V-Log #002 – Introduction
002 digital marketing
あなたはここですべての有用な情報を見ることができます: ここでもっと見る
あなたはここですべての有用な情報を見ることができます: ここでもっと見る
1 comment
Sir, you have the best skill of explaining, it was valueable video.